महासैनिक भवन येथून सुमारे दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : महासैनिक भवन येथून सुमारे दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक डिसेंबर रोजी संध्याकाळी पावणे सात ते सात वाजण्याच्या दरम्यान महासैनिक भवन, करंजे, सातारा येथे मुलाच्या बारशामध्ये आलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी एक लाख 55 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. याबाबतची फिर्याद जयवंत सुरेश टिळेकर वय 34 रा. किडगांव, तालुका सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार तावरे करीत आहेत.


