maharashtra

केटीएम गँगकडून 103 तोळे सोने जप्त

5 जणांना अटक: सातारा पोलिसांची कारवाई

जिल्ह्यातील पारगाव, खंडाळा, शिरवळ, भुईज, वाई, उंब्रज या भागात के.टी.एम. मोटार सायकलवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. 5 जणांना अटक करून तब्बल 103 तोळे सोने, 50 किलो चांदी जप्त केली.

सातारा :  जिल्ह्यातील पारगाव, खंडाळा, शिरवळ, भुईज, वाई, उंब्रज या भागात के.टी.एम. मोटार सायकलवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. 5 जणांना अटक करून तब्बल 103 तोळे सोने, 50 किलो चांदी जप्त केली. सातारा जिल्ह्यातील ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली. दरम्यान, या टोळीने पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली जिल्हयात तसेच कर्नाटक व गुजरात राज्यातही घरफोड्या केल्या आहेत.
सुखदेव सिलोन नानावत रा. घोटावडे ता. मुळशी जि. पुणे, राम धारा बिरावत रा. करमोळी, पो. पौंन्ड ता. मुळशी जि. पुणे, परदुम सिलोन नानावत रा. घोटावडे ता. मुळशी जि. पुणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. एकाच वेळी 15 ते 40 ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र चोरटे व त्यांनी चिरलेला सोन्याचा ऐवज पोलिसांना मिळत नव्हता. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) हे तपास करत असताना त्यांना के. टी.एम. दुचाकीवरील टोळीने घरफोड्या केल्याचे समजले. सातारा पोलिस त्यानुसार संशयितांचा शोध घेत होते. गेली 3 महिने सातारा पोलिस मागावर असताना त्यांना चोरट्यांची ठोस माहिती मिळाली आणि उचलबांगडी केली. त्यानुसार संशयितांनी चोऱ्यांची कबुली दिली.
पोलिसांनी चोरट्यांकडे अधिक चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरीचे सोने गुजरात मधील सोनार असलेल्या महिलेला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासाचा फास आवळला आणि चोरीचे सोने जप्त केले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, रवींद्र मोरे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, शरद बेबले, निलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अमोल माने, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, राकेश खांडके, सनी आवटे, हसन तडवी, अरुण पाटील, शिवाजी भिसे, राजू कांबळे, अर्जुन शिरतोडे, अमित माने, मनोज जाधव, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल दौंड, धीरज महाडिक, केतन शिंदे, सचिन ससाने, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, शिवाजी गुरव, अमृत करपे, दलजित जगदाळे, पंकज बेचके, संभाजी साळुंखे, महिला अंमलदार दिपाली यादव, यश्चदा मोरे, मोनाली निकम, शकुंतला सणस, अधिका वीर, प्रीती पोतेकर, मोनाली पवार, काजल साबळे, अनुराधा सणस, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, फॉरेन्सिक विभागाचे सपोनि रूपाली मोरे, विजय जाधव, गजानन तोडकर, मोहन नाचन, राजू कुंभार, अमोल जाधव, अनिल खटावकर, अमोल निकम, रूद्रायणी राऊत यांनी सहभाग घेतला. कारवाई सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.