maharashtra

तोतयागिरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


तोतयागिरी केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : तोतयागिरी केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपजिल्हा रुग्णालय कराड येथे सुहास दिलीप बोरवे वय 27 राहणार दुशेरे, ता. कराड हा त्याच्या नावाचे बोगस ओळखपत्र तयार करून वावरताना आढळून आला. याबाबतची फिर्याद निलेश शंकर माने राहणार कराड, तालुका कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.