अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला असल्याची खबर शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला असल्याची खबर शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटातून सतीश मनीलाल पारेख वय 55, रा. मंगळवार पेठ, सातारा हे चालत जात असताना मागून आलेल्या अनोळखी वाहनाने त्यांना धडक दिली. अधिक उपचारासाठी त्यांना सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची खबर शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.


