maharashtra

दारू पिण्यास पैसे न दिल्याने जबरी चोरी


दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने जबरी चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने जबरी चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास राहुल जगताप राहणार सातारा याने सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथील कॅन्टीन च्या समोर मंगेश उमेश चव्हाण वय 26, रा. कारंडवाडी, ता. सातारा याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र चव्हाण यांनी नकार दिल्याने जगताप यांनी शिवीगाळ करत चव्हाण यांच्या खिशातील पाचशे रुपयाची नोट जबरदस्तीने चोरून घेऊन गेला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार डी.जी. पवार करीत आहेत.