सातारा शहर परिसरातून मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरातून मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साडेनऊ ते 16 ऑक्टोबर च्या सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान गावडे हॉस्पिटल, गणेश चौक, कोडोली येथे घरासमोर पार्क केलेली मोटरसायकल क्रमांक एम एच 11 सीएफ 2412 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद राहुल रवींद्र गावडे वय 24 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पो.ना. भिसे करीत आहेत.


