सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहुल चंद्रकांत चव्हाण राहणार शनिवार पेठ, सातारा यांची राहत्या घरासमोर पार्क केलेली वीस हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक एमएच 11 बीएफ 0122 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


