maharashtra

घराच्या वाटणीवरून चौघांना मारहाण

सात जणांविरोधात गुन्हा दाखल

घराच्या वाटणीवरून चौघांना मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : घराच्या वाटणीवरून चौघांना मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ज्योतिबाची वाडी, पोस्ट वेळे कामथी, ता. सातारा येथे घराच्या वाटणीच्या कारणावरून अमोल अंकुश नरुळे, प्रिया अमोल नरुळे (दोघे रा. मंगळवार तळे, सातारा), सुप्रिया विशाल कदम, विशाल कदम (दोघे रा. शाहूपुरी चौक, सातारा), कृष्णदेव जाधव, ज्योती कृष्णदेव जाधव (दोघे रा. आंबेदरे जाधव वाडी ता. सातारा) घनश्याम मोरे रा. आंबेदरे, मोरेवाडी, ता. सातारा या सात जणांनी कोमल सुनील नरळे यांच्यासह त्यांच्या पती, सासू-सासरे यांना मारहाण केली आहे. याबाबतचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.