वसंत लेवे यांच्या जननायक विकास पुस्तिकेचे साताऱ्यात प्रकाशन
पाच वर्षाच्या विकासकामांचा लेखाजोखा ठेवला सातारकरांचा समोर
प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जननायक या छोटेखानी पुस्तिकेद्वारा सातारकरां समोर ठेवला आहे. साताऱ्यात चिमणपुरा पेठ व परिसरातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सातारा : प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जननायक या छोटेखानी पुस्तिकेद्वारा सातारकरां समोर ठेवला आहे. साताऱ्यात चिमणपुरा पेठ व परिसरातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या एकूण 22 नगरसेवकांपैकी शहराच्या पश्चिम भागामध्ये वार्ड क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत बबनराव लेवे यांनी सातत्याने पाच वर्ष पाठपुरावा करून तब्बल दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामे वार्डात उभी केली. या कामांचा सविस्तर अहवाल आणि त्याच्या संग्राह्य नोंदी सुद्धा त्यांनी जवळ ठेवल्या.
समाज मंदिर, मेडीटेशन हॉल, स्वच्छ आणि सुंदर ओढे, वॉर्डात अद्ययावत बायो टॉयलेट्स, याशिवाय महादरे तलावाचा गाळ उपसा, मंगळवार तळ्याची स्वच्छता, दरे येथील मारुती मंदिराचे पुनरुज्जीवन, गोखले हौदाचे नूतनीकरण, मराठा जिमखाना येथे अद्ययावत व्यायाम शाळा, वॉर्डामध्ये व पारंपारिक ऊर्जेचे दिवे तसेच रस्त्यांचे पुर्ण डांबरीकरण, कोरोना काळामध्ये वॉर्डातील जास्तीत-जास्त नागरिकांचे दुहेरी लसीकरण, याशिवाय एसटी संपामध्ये सहभागी असलेल्या सातारा आगाराच्या 70 कुटुंबियांना दोन महिने पुरेल इतके शिधावाटप अशा विविध कामांची पूर्तता वसंत लेवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामूहिकरित्या केली.
वसंत लेवे यांनी आपल्या कामांमध्ये क्रियाशीलता आणि रचनात्मकता या दोन्ही गोष्टींवर सातत्याने भर दिला आहे. या कामांचा आढावा घेणारी जननायक ही विकास पुस्तिका तयार करण्यात आली होती. या पुस्तिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. साताऱ्यात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात महेश पवार, रवींद्र पाटेकर, जयवंतराव गायकवाड, सतीश घोरपडे, सुनील चतुर, अनिल तांबे काका, कॅप्टन शहाजी परदेशी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सातारकरांचा मनामध्ये या विकास पुस्तिकेचे प्रचंड आकर्षण आहे. संपूर्ण कामाचा स्वतंत्र लेखाजोखा आणि त्याची आकर्षक सचित्र मांडणी अशी ही पुस्तिका वसंत लेवे यांनी सातारकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आगामी सातारा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये सातारकरांसाठी काय केले, याची मांडणी होणे आवश्यक होते. कोणतेही काम वार्डात नाही म्हणून करावयाचे नाही, हा संकुचित विचार कधीच केला नाही. शहराच्या पश्चिम भागातील परिसरासाठी सातत्याने विकासकामांचा आग्रह धरून त्यासाठी प्रयत्नरत राहिल्याचे वसंत लेवे यांनी सांगितले. या कामांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असून जनता जनार्दन कायमच माझ्या पाठीशी आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


