maharashtra

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खानापूर तालुका वाई येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तेथीलच सनी कमलाकर पवार याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोमदे करीत आहेत.