maharashtra

साताऱ्यात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

सुधांशू त्रिवेदी व राज्यपाल कोश्यारी यांचा केला निषेध

सातारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना माफी वीर ठरवणाऱ्या सुधांशू त्रिवेदी भाजप राष्ट्रीय प्रवक्ता व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. पोवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सातारा : सातारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना माफी वीर ठरवणाऱ्या सुधांशू त्रिवेदी भाजप राष्ट्रीय प्रवक्ता व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. पोवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी प्राची ताकतोडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस धनश्री महाडिक, प्रदेश सचिव महिला काँग्रेस सुषमा राजेघोरपडे, जिल्हा अध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार सेल मनीषा पाटील, co - cordinator पारधी समाज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस रजिया शेख - शहर अध्यक्ष महिला काँग्रेस मालन परळकर - सेवादल, महिला जिल्हा अध्यक्ष व अमोल शिंदे युवक काँग्रेस सातारा जिल्हा, अरबाज शेख प्रदेश कार्याध्यक्ष वक्ता विभाग, गणेश शिंदे , रिजवान शेख युवक काँग्रेस सातारा जिल्हा, विजय मोरे, अभय कारंडे उपस्थित होते.