आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास मुरलीधर मुळे वय 21, रा. मंगळवार पेठ, सातारा याला दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना त्या आदेशाचा भंग करून तो जिल्ह्यात येण्याबाबत कोणतीही परवानगी न घेता पॉवर हाऊस झोपडपट्टी च्या आडोशास आढळून आला. याप्रकरणी विकास मुळे याच्यावर हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.


