आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी 8.30 वाजण्याच्या सुमारास कमानी हौद ते पोवई नाका रस्त्यावर साद युनुस शेख रा. गुरुवार पेठ, सातारा याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रथमेश किरण भागवत रा. विकास नगर सातारा व त्याच्या चार अनोळखी मित्रांनी विनामास्क गर्दी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली.


