maharashtra

प्रवासादरम्यान महिलेच्या सोन्याच्या गंठणाची चोरी


प्रवासादरम्यान महिलेच्या सोन्याच्या गंठणाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : प्रवासादरम्यान महिलेच्या सोन्याच्या गंठणाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ पंचावन्न ते दहा वाजण्याच्या दरम्यान मंगल तानाजी जाधव राहणार क्षेत्रमाहुली, खावली, ता. सातारा या सातारा ते उंब्रज असा प्रवास करीत असताना त्यांच्या हातातील बॅगेची चेन अर्धी खोलून अज्ञात चोरट्याने बागेतील 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक ठोंबरे करीत आहेत.