साताऱ्यात चेन स्नॅचिंगची घटना घडली असून चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावून पोबारा केला आहे.
सातारा : साताऱ्यात चेन स्नॅचिंगची घटना घडली असून चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावून पोबारा केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास आशा चंद्रकांत पोवार वय 61, रा. गोरखपूर, पिरवाडी, सातारा या महिला डॉ. गुरव यांच्या हॉस्पिटल समोरून पायी चालत घरी जात असताना समोरून दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकल वरून येऊन पाठीमागील बसलेल्या व्यक्तीने पोवार यांचे 30 ग्रॅम वजनाचे 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून घेवून ते पळून गेले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.


