maharashtra

जिल्ह्यातील दोन जण बेपत्ता


जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुनम सुरेश उंबरकर वय 18 राहणार यवतेश्वर,ता. सातारा ही युवती शिवण क्लास ला जाते, असे सांगून घरातून निघून गेली आहे. ती अद्याप परत आली नसल्याची फिर्याद सुरेश रामचंद्र उंबरकर वय 43 यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 12 सप्टेंबर रोजी दहा वाजण्याच्या सुमारास अभय भीमराव चव्हाण वय 40 रा. दीपक प्लाझा, सैदापूर, ता. कराड हे राहत्या घरातून कोणासही काहीही न सांगता निघून गेले आहेत. याबाबतची खबर अमोल भीमराव चव्हाण वय 34 यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.