maharashtra

जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न


Annual general meeting of District Krishi Karmachari Sahakari Patsanstha was held in an enthusiastic atmosphere
सातारा जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ५१ वी वार्षिक साधारण सभा रविवार दि. १९ रोजी  खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

सातारा : सातारा जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ५१ वी वार्षिक साधारण सभा रविवार दि. १९ रोजी  खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
संस्थेचे संचालक संजय मांढरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सभेत समाजाशी, सहकार चळवळीशी, बँकेशी बांधिलकी असणा-या, निधन पावलेल्या मान्यवर, कार्यकर्ते, बँक सेवक/माजी सेवक, तसेच देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शूर जवान याशिवाय ज्ञात, अज्ञात मृत बँक खातेदार, संस्थेचे हितचिंतक इत्यादिंना सभेने श्रध्दांजली वाहिली.  
संस्थेचे अध्यक्ष विश्वजित राजूरकर यांनी संस्थेच्या अहवाल सालातील कामाचा, प्रगतीचा, कार्याचा आलेख सभेसमोर विषद केला. यामध्ये सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कार्यान्वित असलेल्या विविध कर्ज व ठेव योजना, सामाजिक बांधिलकी म्हणून जपत असलेल्या विविध योजना इ . चा उल्लेख करुन संकल्पपूर्तीची, भावी संकल्पाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणानंतर सभेचे रीतसर कामकाज पार पडले.
याप्रसंगी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील म्हणाले, सातारा जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांना अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा करीत आहे. पतसंस्थेने मार्च २०२२ अखेर एक कोटी सातारा लाखांचा निव्वळ नफा मिळवला असून, सभासदांनी जास्तीत जास्त ठेवी पतसंस्थेत ठेवण्याचे आवाहन केले.
बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, संस्थेने यंदाच्या वर्षी १५ टक्के लाभांश दिला असून पतसंस्था प्रगतीच्या शिखारकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार अनिल देसाई तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे,  सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांच्या हस्ते करणेत आला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी यावेळी संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत समाधान व्यक्त केले. संस्थेचा कर्जाचा १० टक्के व्याजदर असून बँकेच्या माध्यमातून संस्थेची वसुली चांगली झाली आहे. सदर संस्था बँकेच्याच कर्मचाऱ्यांची असलेने बँकेप्रमाणे संथेचे उत्कृष्ठ कामकाज चालू आहे. संस्थचे स्वनिधी चांगले असलेने बाहेरील कर्जाचे प्रमाण कमी आहे.
बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील तसेच आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी या संस्थेचे उत्कृष्ठ कामकाजाचे कौतुक करून यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सभेस बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक अधिकारी व सभासद उपस्थित होते.
संस्थेचे संचालक उद्धव देशमुख यांनी सभेस उपस्थित मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.