वडूज येथे घरफोडी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : वडूज येथे घरफोडी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा ते 15 नोव्हेंबर रोजी च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने निलेश विजय शेट्टी राहणार पुसेगाव रोड वडूज तालुका खटाव यांच्या हॉटेल साई स्नॅक्स सेंटर व विजया गॅस एजन्सी मधील काउंटर मध्ये ठेवलेली रोख रक्कम व चिल्लर असा एकूण पाच हजार रुपयांचा घरफोडी करून चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ओंबासे करीत आहेत.


