शिक्षणासाठी माहेरून पैसे घेऊन येण्यासह चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : शिक्षणासाठी माहेरून पैसे घेऊन येण्यासह चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ मार्च २०२१ नंतर ३ महिन्यांपासून दि. १६ फेब्रुवारी २०२२ अखेर कारंडवाडी,, ता. खटाव व रजपुतवाडी, ता. करवीर येथे पती अविराज महादेव राजपूत रा. रजपुतवाडी, ता. कराड याने पत्नी करिष्मा हिचा तुझ्या शिक्षणासाठी माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणत तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला शिवीगाळ, दमदाटी करून तिचा शारीरिक व मानसिक जाचहाट केला. तसेच पत्नी करिष्मा हिच्या आईला मारहाण केल्याची तक्रार औंध पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तक्रारीवरुन अविनाश रजपूत याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


