हॉटेलमधील नोकराने 31 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : हॉटेलमधील नोकराने 31 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हॉटेल हेरिटेज व्हिला, आटाळी, ता. सातारा या हॉटेलमध्ये कामास असलेल्या निलेश प्रकाश शेलार याने हॉटेलमध्ये राहण्यास असलेल्या खासेराव रामचंद्र माने रा. धायरी, पुणे यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल व मोबाईलच्या कव्हर मध्ये असलेले एक हजार रुपयांची रोख रक्कम, हॉटेलच्या कॅश काऊंटर मध्ये असलेले वीस हजार रुपये असा एकूण 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.


