कोणतेही कारण नसताना मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : कोणतेही कारण नसताना मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार दि. 9 रोजी रात्री 11.30 वाजता घडला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका वृध्देने फिर्याद दिली असून, सचिन अशोक साबळे, संतोष शंकर साबळे, किरण विष्णू साबळे (सर्व रा. शिवथर, ता. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार गोरे तपास करत आहेत.


