maharashtra

जिल्ह्यात दोन ठिकाणी आदेशाचे उल्लंघन


Violation of order in two places in the district
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

सातारा : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी 10.30 वा. सुमारास रेंगडी, ता. जावली गावच्या हद्दीत हॉटेल ग्रीन लिफ च्या आवारात 50 ते 60 जण विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता आढळून आले. याबाबत अमित गणपत ढेबे (रा. महाबळेश्‍वर) या व्यवस्थापकाने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना ती न घेता आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पो. हवा. जितेंद्र कांबळे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर ढेबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्‍या घटनेत 18 ऑक्टोबर रोजी 7.45 वा. सुमारास फलटण, ता. फलटण येथील मॅक्स कलेक्शन नावाच्या दुकानात लोकांची गर्दी करुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सचिन गंगाधर नरवडे (रा. हडपसर), ऋषिकेश जालिंदर वाघमारे (रा. जाधववाडी), ऋषिकेश रामदास शिर्के (रा. खुंटे) या तिघांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.