maharashtra

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी


One hard labor for molesting a woman
फलटण तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बापूराव शंकर भगत, वय 38, रा. पिंप्रद, ता. फलटण याला न्यायालयाने एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

सातारा : फलटण तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बापूराव शंकर भगत, वय 38, रा. पिंप्रद, ता. फलटण याला न्यायालयाने एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 जानेवारी 2018 रोजी फलटण तालुक्यातील एका महिला सासुबाई यांच्या घराकडून चालत जात असताना बाबुराव शंकर भगत हा दुचाकी घेऊन त्या ठिकाणी आला. त्याने त्या महिलेच्या हाताला धरून चल येतीस का? गाडीवर बस. असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच शिवीगाळ केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तदनंतर त्याच दिवशी बापूराव भगत याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे यांनी करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सातारा येथील न्यायालयात पाचवे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी आज एकूण पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये बापूराव भगत दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.