maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 फेब्रुवारी रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगरपालिका चाळ शेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ यश शिवपालक आणि अर्जुन शिवपालक यांनी काही कारण नसताना लखन भानुदास कमाने वय 27 राहणार लक्ष्मी टेकडी, सदर बाजार यांना दगडाने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.