maharashtra

सदर बाजार येथून दुचाकीची चोरी


सदर बाजार येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सदर बाजार येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता सदर बाजार, सारंग हॉल समोर असलेल्या पारिजात गादी सेंटर येथे पार्क केलेली मनीषा शंकर काकडे रा. सदर बाजार, सातारा यांची चाळीस हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एमएच 11 डीजी 2314 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक ठोंबरे करीत आहेत.