maharashtra

वीज चोरी प्रकरणी एकावर गुन्हा


A case against one in electricity theft case
वीज चोरी प्रकरणी एकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : वीज चोरी प्रकरणी एकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोळेवाडी, तालुका माण येथे शिवाजी सर्जेराव रोमन यांनी घरगुती वीज कनेक्शन असताना सुद्धा महावितरण कंपनीच्या विद्युत मीटर मध्ये दुसरी वायर जोडून वीज चोरी केली होती. रोमन यांच्याकडून मागील 24 महिन्यांचे 56 हजार 730 व तडजोड रक्कम 8 हजार असे 64 हजार 730 रुपये वीस बिल थकीत असल्याने त्यांच्यावर रणजीत गौरीहर देशमुख यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक टी. बी. ढोले करीत आहेत.