वाई, ता. वाई येथे एस.टी. मध्ये चढत असताना एका महिलेचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : वाई, ता. वाई येथे एस.टी. मध्ये चढत असताना एका महिलेचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ जानेवारी रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास वाई येथील एस.टी. स्टँड आगारात सौ. इंदु शिवराम वाघ, वय ७०, रा. चिखली, ता वाई ही महिला वाई - स्वारगेट एस. टी.मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


