maharashtra

डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयात जागतिक योग दिन साजरा


Celebration of World Yoga Day at Shri Shivaji Vidyalaya at Diskal
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयात प्राणायाम, योगासनांच्या प्रात्यक्षिकासह आरोग्यपूर्ण प्रशिक्षणाने आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.  

पुसेगाव : डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयात प्राणायाम, योगासनांच्या प्रात्यक्षिकासह आरोग्यपूर्ण प्रशिक्षणाने आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.  
याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या योगशिक्षिका सौ. स्वाती भुजबळ, स्वप्निल शिपटे यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान आदीची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करुन घेतली. योगशिक्षिका सौ. भुजबळ यांनी योगासनांच्या माध्यमातून निरोगी जीवनाचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्रीडा शिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनीही योगाची प्रात्यक्षिके सादर केली. शरीर व मनाच्या संतुलनासाठी व्यायाम हा जीवनाचा भाग व्हावा, असे सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश जंगम यांनी सांगितले. मुख्याध्यापक आर. एम. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपशिक्षक सुनील वायदंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.