maharashtra

शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू


शेतीसाठी विद्युत पंप सुरू करत असताना शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी काशीळ, ता.सातारा येथे घडली. शरद बाजीराव जाधव (वय.५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सातारा : शेतीसाठी विद्युत पंप सुरू करत असताना शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी काशीळ, ता.सातारा येथे घडली. शरद बाजीराव जाधव (वय.५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेतकरी शरद जाधव हे सोमवारी दुपारी पत्नीसमवेत काशीळ येथील इनाम नावाच्या शिवारात गेले होते. यावेळी शेताला पाणी देण्यासाठी शरद जाधव हे विहिरीजवळ असलेल्या विद्युत मोटरीच्या खोक्याजवळ गेले. खोके उघडत असतानाच त्यांना जोरदार शॉक लागला. यावेळी त्यांना तात्काळ उपचारासाठी नातेवाईकांनी उंब्रज येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची फिर्याद चुलतभाऊ धनाजी शामराव जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.