सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ३२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ३२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव - जळगाव जाणाऱ्या मार्गावर एका मंदिराच्या पाठीमागे सचिन सुरेश देशमुख रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव याच्याकडून ४८० रुपयांच्या, गोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत अजंठा चौक येथे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तेथीलच हिराबाई राजाराम निंबाळकर हिच्याकडून ६६० रुपयांच्या, खोडशी, ता. कराड गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या आडोशाला सुनील जगन्नाथ रा. मुंढे याच्याकडून १ हजार ९२० रुपये,निहंबे- चिरंबे, ता पाटण गावच्या हद्दीत हॉटेलच्या आडोशाला दीपक हणमंत मुळे, रा. विहे, ता.पाटण याच्याकडून १ हजार २६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.


