maharashtra

सातारा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनांकडून येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनांकडून येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्ह्यातील एकमेव भन्ते दिंपकरजी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा तालुका व जिल्हा कार्यकारिणीतील ज्येष्ट पदाधिकारी यांचे वाखणण्यासारखे नियोजन पहायला मिळाले. याकामी, भागवत भोसले, बाळासाहेब जाधव, विद्याधर गायकवाड, आबासाहेब दणाने, नंदकुमार काळे, ऍड.विजयानंद कांबळे, अजित कांबळे, महादेव मोरे, दिलीप फणसे आदींनी अथक असे परिश्रम घेतले. यावेळी चंद्रकांत खंडाईत, भागवत भोसले आदींनी मनोगत व्यक्त केली. पूर्व संध्येपासून भिमबुद्ध गीतांनी सांगता केली.
संपूर्ण विधी, मानवंदना आदी कार्यक्रमाने अभिवादन करण्यात आले. यावेळी  संतोष मोरे, सौ. कविता कांबळे व असंख्य उपासक - उपासिका यांचा मोठ्या संख्येने गायन पार्टीत सहभाग होता. सायंकाळच्या शेवटच्या सत्रात डॉ. बाबासाहेब लहानपणी ज्या वाड्यात राहिले होते. त्याठिकाणांहून कॅडल मार्च काढून भिमाई स्मारकाजवळ सांगता करण्यात आली. दरम्यान, दिवसभर डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. यात काष्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुशीलकुमार कांबळे, जिल्हा समाजकल्याण समितीचे माजी सभापती बाळासाहेब शिरसाट, बंधुत्व प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा अनिल वीर व त्यांचे सहकारी, ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते वामन मस्के, महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने, ऍड.विजयानंद कांबळे व अजित कांबळे, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, अण्णा वायदंडे, आप्पा तुपे, प्रतीक गायकवाड व दिपकभाऊ निकाळजे - आं. गटाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, महिला गटाच्या जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे, गवई गटाचे संजय गाडे याशिवाय, संबोधी प्रतिष्ठानतर्फे रमेश इंजे व ऍड. हौसेराव धुमाळ, बहुजन समाज पार्टी विधानसभाध्यक्ष सतीश गाडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, उपाध्यक्ष संदीप कांबळे, क्षिरसागर, कांबळे, युवा महासचिव सायली भोसले आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधिनी पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे, संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, रमेश माने, विलास कांबळे, साहित्यिक पार्थ पोळके, गणेश कारंडे, बी. एल. माने, ऍड.दयानंद माने, संजय नितनवरे, रावण गायकवाड, पी.टी.कांबळे, जे.डी. कांबळे, नवनाथ लोंढे, प्रकाश तासगावकर, श्री.व सौ. धम्मचारी संघादित्य, योगेश मस्के, ऍड. विलास वहागावकर, सुनील निकाळजे, श्रीरंग वाघमारे, सुधाकर काकडे, प्रकाश गायकवाड, चंद्रकांत मस्के, सी. जगताप, प्रसाद गायकवाड, दिलीप सावंत, श्री.व सौ.धनसिंग सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, मनोहर सावंत, तुकाराम गायकवाड आदी मान्यवर - कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बुद्ध धम्म संघ यांच्यावतीने धम्मतारा बौद्ध दिनदर्शिकेचे प्रकाशन व मोफत वितरण करण्यात आले.