येथील मल्हार पेठ मधील पत्र्याच्या शेडमधुन अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची देशी गाय चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील मल्हार पेठ मधील पत्र्याच्या शेडमधुन अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची देशी गाय चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ ऑगस्ट रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील मल्हार पेठ मधील राहत्या घरासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमधुन अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची एक काळया रंगाची देशी गाय चोरून नेल्याची तक्रार नागनाथ दिनकर बडेकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


