maharashtra

खेड बुद्रुक येथून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी


Mobile stolen with gold and silver jewelery from Khed Budruk
खेड बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून ४६ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व मोबाईलची चोरी केल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : खेड बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून ४६ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व मोबाईलची चोरी केल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ मार्च रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास खेड बुद्रुक येथील सुयोग मोहन धायगुडे आणि कलावती दत्तात्रेय धायगुडे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ४६ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व मोबाईलची चोरी केल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.