maharashtra

लॅपटॉपसह रोख रकमेची चोरी


Theft of cash with laptop
गोखळी, तालुका फलटण येथील एका महिला डॉक्टरच्या क्लिनिक मधील लॅपटॉप आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातारा : गोखळी, तालुका फलटण येथील एका महिला डॉक्टरच्या क्लिनिक मधील लॅपटॉप आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान डॉक्टर सोनाली विदुर गुंडगे वय 28, राहणार बुवासाहेब नगर, कोळकी, तालुका फलटण यांच्या क्लिनिकच्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आज प्रवेश करून, केविनचा ल्युमिनियमचा दरवाजा कशाने तरी उघडून टेबलाच्या खाली ठेवलेला वीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि टेबलाचे ड्रॉवर कशाने तरी उचकटून त्यातील एक हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली असल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक बोडरे करीत आहेत.