महिलेला मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : महिलेला मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णात कदम, संतोष कदम, संदेश कदम (रा. ब्राम्हणवाडी ता.सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना दि. 26 नोव्हेबर रोजी घटना घडली आहे. कृष्णात कदम, संतोष कदम, संदेश कदम या संशयितांनी रॉडने मारहाण केली. तसेच मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे तक्रारीत महिलेने म्हटले आहे.


