maharashtra

सातारा जिल्ह्यातून दोन दुचाकींची चोरी


Theft of two bikes from Satara district
सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० फेब्रुवारी रोजी ते दि. ११ फेब्रुवारी दरम्यान पारगाव, ता. खंडाळा येथील राहत्या घरांची मोकळ्या पटांगणावर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. ११ सीझेड ९३३० अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार रोहित विजय जगताप रा. पारगाव यांनी खंडाळा पोलिस ठाण्यात दाखल केली.  अन्य एका घटनेत दि. १३ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान विखळे, ता. कोरेगाव येते राहत्या घराच्या मोकळ्या जागेत पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.११ बीसी ९८४३ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार तेथीलच तानाजी दगडू माळी यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल केली. संबंधित चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.