maharashtra

अखेर समीर कच्छीला लागला मोक्का

आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला आले यश

समीर कच्छीसह 46 जणांवरील मोक्का कारवाईला मंजुरी मिळाली आहे. कच्छीवर कारवाई करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सरदार (सागर) भोगावकर यांनी मागील दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता.

सातारा : समीर कच्छीसह 46 जणांवरील मोक्का कारवाईला मंजुरी मिळाली आहे. कच्छीवर कारवाई करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सरदार (सागर) भोगावकर यांनी मागील दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता.
गेली कित्येक वर्ष सातारकरांना आपल्या अवैध धंद्यांद्वारे जेरीस आणणाऱ्या समीर कच्छी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात यावी यासाठी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देत आंदोलनाचे हत्यारही उपसले होते.
त्यांनी केलेल्या या समाजोपयोगी परिश्रमाचे फलित म्हणून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी समीर कच्छी सह त्याच्या 46 साथीदारांवर मोक्कान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्याला पोलीस प्रशासनाने मंजुरी दिली असून समीर कच्छी आणि त्याच्या 46 साथीदारांवर मोक्का बसणारच, असा विश्वास सागर भोगावकर यांनी व्यक्त केला आहे.