maharashtra

सासुला शिवीगाळ करून चावा घेतल्याप्रकरणी सुनेवर गुन्हा


Crime against Daughter in law for abusing mother-in-law and taking bite
मंगल कार्यालयाच्या मालकी हक्कावरून सासुला शिवीगाळ करून तिचा चावा घेतल्याप्रकरणी सुनेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : मंगल कार्यालयाच्या मालकी हक्कावरून सासुला शिवीगाळ करून तिचा चावा घेतल्याप्रकरणी सुनेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 मार्च रोजी 3 वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील मुलगा पेटीत असणार्‍या गोकुळ मंगल कार्यालय येथे मंगल कार्यालयाच्या मालकीहक्कावरून रसिका कालिदास तायस्कर, वय 42 यांनी सासु सुवर्णा दिलीप तायस्कर, वय 62 यांना शिवीगाळ करून त्यांचा चावा घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.