राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा
महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा (Sharad Pawar Resigning) केली आहे. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.
गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे पुढचा अध्यक्ष कोण तसेच राष्ट्रवादी बीजेपी मध्ये विलीन होणार का असे नवनवीन तर्क वितर्क सुरू झाले आहेत.


