maharashtra

प्रशांत आष्टीकरांवरील शाईफेक आणि प्राणघातक हल्ल्याचा निषेध

कराड पालिकेत घोषणाबाजी : अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

protest against the deadly attack on Prashant Ashtikar
अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रशांत आष्टीकर यांच्यावर शाईफेक करून प्राणघातक हल्ल्या केल्याची घटना घडली. याचा कराड नगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

कराड : अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रशांत आष्टीकर यांच्यावर शाईफेक करून प्राणघातक हल्ल्या केल्याची घटना घडली. याचा कराड नगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी पालिका कर्मचारी संघटनेचे आनंदा खवळे, अभियंता ए.आर. पवार यांच्यासह कर्मचार्‍यांनी निषेधाच्या घोषणा देत या भ्याड हल्याचा निषेध केला. तसेच संतप्त प्रतिक्रिया नोंदवत तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली.
अमरावती महापालिकेचे आयुक्त आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात आ. रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. राणा आणि अन्य 11 आरोपींवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे.
आयुक्त आष्टीकर यांनी राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्याने त्यांच्यावर काल बुधवारी शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी कराड पालिकेतील अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात आले. राजपत्रित संघ आणि नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग ही या आंदोलनात सहभागी झाला होता.