साताऱ्यात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : साताऱ्यात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 ऑक्टोबर रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास वनवासवाडी हिरा एम्पायर सातारा येथील एटीएम मशीन वर अज्ञाताने दगडाने मारून तसेच एटीएम मशीन चा दरवाजा उघडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी ओंकार महादेव रानडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस नाईक भिसे करीत आहेत.


