बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्याच्या आनंदात कराडात जल्लोष
शेतकरी, मालक, शौकीनांमध्ये आंनंदोत्सव : अनेक ठिकाणी फटाके वाजवून गुलालाची उधळण
सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचा राज्यासह ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील सैदापूर- गोवारेसह अन्य ठिकाणी शेतकरी, मालक, बैलगाडी शर्यत शौकीनांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
कराड : सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचा राज्यासह ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील सैदापूर- गोवारेसह अन्य ठिकाणी शेतकरी, मालक, बैलगाडी शर्यत शौकीनांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
सैदापूर-गोवारे ता. कराड येथील बैलगाडी मालक धनाजी शिंदे यांच्या घरी सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याच्या निर्णयाचा आंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी बैलांचे पूजन करून त्यांना गुलालात न्हावून टाकले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर अनेक ठिकाणी शेतकरी, मालक, बैलगाडी शर्यत शौकीनांमध्ये भावनिक वातावरण मिर्माण झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर तालुकाव जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेतकरी, बैलगाडी मालक व शर्यत शौकीनांनी या निर्णयाचा फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला
सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला आहे. याब्बाढाल सुप्रीम कोर्ट, वकिल, राजकीय पक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध संघटना यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच याप्रश्नी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने केलेल्या संघर्षाला आज यश आले आहे. बैलगाडी शर्यती सुरू झाल्याने गोवंश वाचणार असून या ऐतिहासिक निर्णयामुळे आमच्या घरी आज खरी दिवाळी साजरी होत आहे.
- धनाजी शिंदे (बैलगाडी मालक)
सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. याचा आपल्याला खूप आनंद झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमची बैलं गुलालविना उभी होती. आता यापुढे आम्हांला गुलाल पहायला मिळणार आहे. बैलगाडी मालकांनीही कोर्टाच्या निकाला मान राखून अटी व शर्तीचे पालन करावे.
- स्वाती शिंदे


