maharashtra

सासूचा विनयभंग केल्याप्रकरणी जावयावर गुन्हा


सासूचा विनयभंग केल्याप्रकरणी जावयाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : सासूचा विनयभंग केल्याप्रकरणी जावयाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातील विवाहिता तिच्या मैत्रिणी सोबत पंचायत समिती सातारा जवळ असलेल्या रिक्षा स्टॉप जवळून पायी चालत जात असताना या महिलेचा जावई याने तेथे येऊन तिला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून संबंधित महिलेचा उजवा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.