जुन्या भांडणाच्या कारणातून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मर्ढे, ता. सातारा गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणातून विक्रम लक्ष्मण काटकर रा. मर्ढे, ता. सातारा यांना तेथीलच शंकर बळवंत शिंगटे आणि श्लोक शंकर शिंगटे यांनी दगडाने मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहे.


