maharashtra

करंजे गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी

व्हिडिओ व्हायरल ; ग्रामस्थांनी हटकल्यानंतर युवकांचे पलायन

Two groups clashed on Friday night in Karanje village
करंजे, ता. सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून ग्रामस्थांनी हटकल्यानंतर युवकांनी पलायन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने हाणामारी करणाऱ्या इसमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एस. जे. पतंगे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

सातारा : करंजे, ता. सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून ग्रामस्थांनी हटकल्यानंतर युवकांनी पलायन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने हाणामारी करणाऱ्या इसमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एस. जे. पतंगे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, करंजे येथे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वीस ते पंचवीस जणांचा समावेश असणारे दोन गट एकमेकांच्या समोर ठाकले. त्यापैकी काही युवकांच्या हातात दगड होते. दोन गटात प्रथम शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर जोरदार हाणामारीला सुरुवात झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होत त्या युवकांना हटकल्यानंतर त्या युवकांनी पलायन केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
पोलीस निरीक्षक पतंगे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने करंजे येथील महालक्ष्मी मंदिरात जवळ जाऊन माहिती घेतली. त्यावेळी असे समजले, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या कमानी जवळ रस्त्यावर आठ ते दहा इसमांची हिंदी भाषेमध्ये बाचाबाची सुरू होती. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र एक मुलगा फरशीचा तुकडा उचलून तू दुसऱ्या मुलाला मारण्यासाठी जाऊ लागला असता त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलेने हस्तक्षेप केला. काही वेळातच त्यांच्यातील भांडण मिटले व ते त्या ठिकाणाहून निघून गेले. या संपूर्ण घटनेची माहिती घेत असताना संबंधित वाद घालणारे इसम करंजे भागातील रहिवासी नसल्याचे समजले. मात्र त्या अज्ञात इसमांनी वादावादी केली असल्याने त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वादावादी करणाऱ्यांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.