maharashtra

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 ते 19 ऑक्टोबर दरम्यान सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून, तिला मारहाण तसेच कोयता हातात घेऊन जीवे मारण्याची धमकी आणि लग्न करण्यासाठी दबाव टाकल्या प्रकरणी रिहान अन्वर शेख, अन्वर शेख, आरिफ अन्वर शेख सर्व रा. शनिवार पेठ, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मते करीत आहेत.