maharashtra

अपंग महिलेची फसवणूक


गॅलेक्सी इंटरनेट कंपनीच्या नावे पैशाची गुंतवणूक करुन चांगला मोबदला देतो, असे आमिष दाखवून एकाने अपंग महिलेची २० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार दि. २ मे २०२२ पासून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर घडला.

सातारा : गॅलेक्सी इंटरनेट कंपनीच्या नावे पैशाची गुंतवणूक करुन चांगला मोबदला देतो, असे आमिष दाखवून एकाने अपंग महिलेची २० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार दि. २ मे २०२२ पासून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर घडला.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात श्रीमती शिल्पा यशवंत बागल (वय ४१, रा. गोवे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, योगेश मोहन तोरडमल (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. मार्केट यार्ड, कोरेगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार भिसे तपास करत आहेत.