शहर व परिसरात सुरू असणाऱ्या दोन जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेआठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सातारा : शहर व परिसरात सुरू असणाऱ्या दोन जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेआठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
साताऱ्यातील नवीन एमआयडीसीमधील एका पानटपरीच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू होता. शहर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अनिल दत्तात्रय खुडे (वय२६, रा. प्रतापसिंहनग खेड, सातारा), राजकिशोर हरिचंद्र (वय २१, वनवासवाडी सातारा), चंदू चोरगे (रा. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ हजार १७० रुपयांची रोकड, मोबाइल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. या तिघांनाही नोटीस बजावण्यात आले आहे.
दुसरी कारवार्इ कोडोलीमधील एका बेकरीसमोर असलेल्या टपरीच्या आडोशाला करण्यात आली. या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी विकास राऊ काकडे (वय ६०, रा. कर्मवीरनगर, सातारा), सलीम हसन मुलाणी (वय ५२, रा. कोडोली, सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुद्धा पोलिसांनी ४ हजार १७० रुपयांची रोकड, एक मोबाइल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी त्यांनाही नोटीस बजावली आहे. या दोन्ही घटनांची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


