maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू


काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ रोजी ११ वाजण्यापूर्वी काशीळ ता सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या एका मंगल कार्यालयाजवळ अमित अशोक घोरपडे, रा. माजगाव, ता. सातारा हे अपघातात जखमी झाल्याचे आढळून आले त्यांना तात्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. प्रज्योत माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.