रात्रगस्तीसाठी असलेल्या पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचार्याना दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
सातारा : रात्रगस्तीसाठी असलेल्या पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचार्याना दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
विशाल नवनाथ चव्हाण वय 29, रा. महागाव, सुरज उत्तम लोखंडे वय 30, रा.गोडोली, सातारा यांच्या विरुध्द पोलिस विशाल चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 30 ऑक्टोबर रोजी घडली आहे. पोलिस अधिर्कायासह दोन पोलिस कर्मचारी रात्रगस्त घालत होते. त्यावेळी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात फोनच्या कारणातून संशयितांनी तक्रारदार पोलिसाची गचुंडी धरली. यावेळी इतर पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली. यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला.


